Sunday, April 17, 2016

मनात घर केलेले कोनाडे …


      "आरे…!  या घराला कोनाडेच नाहीत, मग समान ठेवणार कोठे ? " असा प्रश्न माझ्या मित्राच्या आजोबांनी केला …
      "कशी रे हि आजकाल ची घरे, ना कोनाडे ना देवळ्या, समान कोठे ठेवणार दिवे कोठे लावणार?"
      "का समान जमिनीवरच ठेवणार?"   इति आजोबा …
माझा मित्र रोहन याचे काहीही न ऐकता प्रश्नांची सरबत्ती चालूच होती .
      "घर म्हणजे काही ४ ठोकळे नसतात त्यात उंबरे, कोनाडे, देवळ्या, देवघर, माजघर, शेजघर, बैठकीची खोली, परसबग, अंगण, तुळशीवृंदावन, आणि पडवी यामुळे शोभा येते… "
      "इथे तर काहीच दिसेना"  इति आजोबा …
      "अहो आजोबा आजकाल च्या flat संस्कृती मध्ये एवढे सर्व मिळणे खूप कठीण आहे"
      "त्यामुळे या 2bhk लाच आता हे सर्व समजावे लगते…." इति रोहन
      "घरी कोणी अनोळखी माणूस किंवा तुझ्या कामा निमित्त कोणी आला तर कोठे बसणार?"  
      "त्याला काय लगेच घरात घाय्याचे का?" इति आजोबा
दिवाणखानात बोट दाखवून "इथे बसेल तो त्यात काय?" असे रोहन आवेशाने म्हणाला…
      "अरे इथून स्वयाम्पाघर दिसते त्यात दिवाणखाना आणी स्वयाम्पाघर यात खिडकी कशाला, ते नेहमी मागे असावे, त्यामुळे स्वयाम्पाघरात काय चालू आहे हे बाहेरच्याला काळात नाही." तेव्हड्याच आवेशाने अजोबांचे उत्तर…
      "पूर्वीची घरे कशी चौसुफी असायची चहुबाजूने खोल्या मध्यात अंगण आणि तुळशीवृंदावन पुढे पडवी बसायला झोपाळा म्हणजे बाहेरची लोकं आली तरी लगेच आत येणार नाहीत, पाहुणे राउळे आले तरच दिवाणखानात प्रवेश, दिवानखान्याच्या मागच्या बाजूला एक मोकळी जागा ज्यातून वर जाण्या साठी जिना
त्यामागे मोकळी खोली, आणि मग त्यामागे स्वयाम्पाघर म्हणजे मागील घरात काय चालू आहे हे पुढे कळणार नाही परंतु आजकाल च्या या नवीन सदनिकांन मधे यासर्व गोष्टी नाहीश्या झाल्या आहेत"
आजोबा अधिकच आवेशाने बोलत होते.
    या सर्व संभाषणा मध्ये आमचे घर पाहायचे राहून जात होते, आम्ही सर्व hall मधेच होतो, शेवटी मित्रच म्हणाला आजोबा आपण सर्व पाहून घेऊयात आणि मग सर्व गोष्टींवर चर्चा करूयात.  असे म्हणून आम्ही सर्व जण घर पाहण्यसाठी पुढील खोलीत गेलो, अर्थात आजोबा हि आले अमच्या मागोमाग परंतु त्यांच्या मनात घर केलेले कोनाडे काही जाइनात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट सांगत होते कि कोनाडे नसलेले घर … या सर्व विचारत अजून भर पडली ती Gallery ची…
     आपलं घर या flat मध्ये सर्वात बाजूला असल्याने आपल्याला मोठी gallery मिळाली आहे, संध्याकाळी मस्त खुर्ची टाकून चहा पीत बसता येईल…
     आजोबा पुन्हा गरजले अरे कसला छज्जा हा यातून पलीकडचे घर दिसते बघ घरात काय चालू आहे हे सर्व दिसत आहे,  याचा अर्थ असा कि बाहेरून आपले हि घर दिसत आसणार याला काय अर्थ, आणि दिसू नये म्हणून सर्व दारे खिडक्या बंद मग हवा खेळती कशी राहणार कसे समजवावे या आजच्या पिढीला समाजातच नाही. अश्या जोरदार गप्पानमध्ये आमचे घर पाहून झाले परंतु कोनाडे तसेच राहिले .
      

No comments:

Post a Comment