Monday, November 14, 2011

फेसबुक स्टेटस अपडेट हे एक नवीन फॅड झालेले आहे. मी म्हणेन याची मुळे त्या फेसबुक च्या शोधतच सापडतील, आहो सापडतील कुठली तेथेच आहेत म्हणाना. आता हेच पहा कोण्या त्या मार्क झुकेन्बर्गने  फेसबुक प्रणाली त्याच्या हारवलेल्य प्रेयसीला शोधण्यासाठी लिहिली असे म्हणतात इति गुगल उगाच लोकांचा कॉपीराइट वगेरे नको संदर्भ दिलेला बरा, आणि हो माझा स्वतःचा एकहि शब्द नाही हो यात हेहि तितकेच म्हत्वाचे वाद वगेरे झाले तर मी लिहिले म्हणून नको, बर असो  आपण फेबु. च्या शोध बद्दल बोलत होतो त्यानेहि कदाचित लगेचच स्टेटस अपडेट करून सांगितले असेल कि, 

         In search of ....Ms . XXXX XXXX

        बर पण मी पुढे जाऊन त्याला ती मिळाली कि नाही याबद्दल शोधण्याचा प्रयत्न केला परंतु याचा उल्लेख मात्र गुगल वरही कोठे नाही, परंतू लोकांना आपल्या प्रेमाची प्रचीती जाहीरपणे फेबु. वर करायला काय आनंद होतो काय सांगावे, आता फेबु. हे हा**ल्या पा**ल्या गोष्टी करण्याचे ठिकाण झाले आहे, आणि तुम्हाला फेबु. वापरायला येत नाही म्हणजे तुम्ही मागास आहात तर फेबु. सर्वात जास्त मित्र किंवा मैत्रिणी असणे म्हणजे आती उच्च कोटी चे असे काहीसे झाले आहे. फेबु. चांगले कि वाईट हा एक वादाचा मुद्दा होईल आणि तो वाद संपणार नाही त्या पेक्षा आपण विषयाला हात घातलेला बरा कसे...
       बर... माझे स्वतःचे फेबु. चे अकौंट नाही आसे नाही त्यातूनच मला हा नवा विषय मिळाला. काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेबु. वर मित्रांशी गप्पा मारत बसलो होतो आणि मला नेहमी सारखे नोटीफीकेशन आले मी सहजच पाहीले तर माझ्या एका जुन्या मैत्रिणीचे ते स्टेटस अपडेट बद्दलचे नोटीफीकेशन होते, साहजिकच मी उत्सुकतेपोटी तिच्या पेज वर जाऊन पाहीले तर अपडेट असे होते.... 

         The last 7 days are best day of my life in Simla....

           नुकतेच लग्न झाले होते तिचे तर ती लग्ना नंतर फिरायला (मधुचंद्रासाठी) गेली होती शिमल्याला पण मला समजत नाही आता तिथे गेल्या नंतर दिवस कसे बेस्ट असतील बरे बेस्ट तर रात्री असल्या पाहिजेत.... पण तसे स्टेटस प्रशस्थ दिसत नाहीना...    माझ्या बुद्धीला मात्र असे वाटले कदाचित त्यांना (म्हणजे तिला आणि तिच्या पतीला) दिवस आणि रात्र यातला फरकच समजला  नसेल म्हणून तिने हे स्टेटस अपडेट केले असावे...... आता तुम्ही तुमचे वाईट विचार जरा बाजूला ठेवा आणि मी कश्या अर्थाने म्हणत आहे ते ऐका... "ते असे झाले असेल कि ते इतके फिरत असतील कि रात्रीही दिवसा प्रमाणे खरेदि साठी फिरले असतील, कारण या बाइसाहेबना दुसरीकडे कोठे स्वर्ग दिसणे जास्त  एक जास्त आवड आहे त्यामुळे बाकीचे सर्व जिथल्या तिथेच राहून गेले असेल"  असो पण तिचा पती माझ्या परिचयाचा नसल्याने त्याचे स्टेटस किंवा विचार माझ्या पर्यंत पोहोचू शकले नाहीत तर त्यामुळे हे अर्ध सत्यच पूर्ण मानावे लागेल.... असो हे ताणण्यात काही अर्थ नाही.
          
        फेबु. स्टेटस अपडेट बद्दल एक नवा किस्सा अगदी परवा परवाच घडला किंवा माझ्या नजरेत आला एका कोणी मुलीने तिच्या नवीन रिलेशन बद्दल काहीसा असा अपडेट केला होता कि
      "This was the best day of my life he proposed me..... :)"

खाली काही कमेंट्स आल्या होत्या त्या वाचून जरा गम्मतच वाटली....

     "Love you baby....thanx but when should I expect Yes from you...???"

     "Or update on facebook can be the Yes"

पुढची कमेंट तिची होती "ए कोण तू तुझ्या बद्दल नाही लिहिलेले... तो माझा मित्र आहे तू कोण मध्ये आला... आधी मी ती कमेंट डीलीट करत आहे.. सॉरी"

     आता या मध्ये तिने अशीच कमेंट डीलीट केली असती तर कळलेच नसते कोणाला पण नाही... अगदी दोन दिवस कमेंट तशीच ठेऊन डीलीट करण्यात काय अर्थ होता कोणास ठाऊक... पण आपल्याला किती कमेंट येतात आणि किती आपण फेमस आहोत हे दाखविण्याचा एक मार्ग आहे... असो ...

    आता स्टेटस अपडेटचा खरा अर्थ काय आहे कोणास ठाऊक कि कश्यासाठी ते स्टेटस अपडेट करायचे कारण काय त्याचे मजा म्हणून कि आज मला काय वाटत आहे ते सांगण्यासाठी कि मला आठवलेली गाण्याची ओळ लिहिण्यासाठी कि मित्र-मैत्रिणींना काही संदेश देण्यासाठी का या सर्वांसाठी कोणास ठाऊक ज्याला जे जसे उमजले ते तो तसे करतो...

       या वरून आठवले कोणी एका नव-गायकाने त्याचं फेबु. वर लिहिले होते

    "प्रिया आज आले मैफिलीत माझ्या...." आता या सो-कॉल्ड खूपच किस्से मी ऐकून होतो कि या माणसाचे गाणे ऐकावे यासाठी हा माणूस पकडून पकडून लोक जमा करतो जसे नवा-कवींचे होते कि नाही कि कविता वाचावी म्हणू किंवा ऐकावी म्हणून पकडून लोकांना जमा करतात तसेच काही से....
    
मला या तर नव-कवींचा जरा जास्तच भीती वाटते कोणी एक संस्कृत नव कवी बद्दल मला आठवते महाराज शाळेत असल्या पासूनच कवी वगेरे झाले होते काही कविता खूप छान असायच्या पण काही मात्र अगदीच बाळबोध असायच्या, महाराजांनी अभियांत्रिकी मध्ये यायचा प्रयत्न केला पण गाडी घसरायला लागल्या नंतर मात्र कला क्षेत्रात उडी मारली, महाराजांचा पिंडच तो तिकडेच  वळणार पाणी... ते जाऊदेत पण या गायक बद्दल बोलत होतो आणि हा काय म्हणत होता प्रिया आज आले मैफिलीत माझ्या... आहो पण यांच्या मैफिलीत कोण येणार हा  गायला लागल्यानंतर हे एक कोडेच आहे काही पशु आले नाहीत तरच बरे ...
    बर त्यात मुलींची प्रोफाईल असली कि मात्र या कमेंट्स न उत येतो.... जरा कोठे मुलगी शिंकली कि नको त्या काळजीच्या कमेंट्स चालूच... काल-परवाच एक जोक वाचला होता एकीकडे मुलीची प्रोफाईल होती आणि चित्रात एका बाजूला मुलाची मुलेने तिचे स्टेटस अपडेट केले होते कि "Not feeling well...."  त्याला काहीशे लाईक आणि पन्नास-साठ कमेंट्स उगाच वाटणाऱ्या काळजीच्या, "अमुक तमुक डॉक्टरांकडे जाऊन ये बरे वाटेल चांगले औषधे देतात " अजून एक असेच काही सागणाऱ्या कमेंट्स  बर दुसऱ्या चित्रात मुलाने स्टेटस अपडेट केले होते कि "Topper in IIT Exam..." आता याला किती कोमेंट्स अपेक्षित आहेत? नाही नाही काही शे किंवा काही हजार वगेरे नाही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या फक्त २ आणि १०-१२ likes आणि हो हि खरीच परिथिती आहे, बर अश्या गोष्टी बद्दल स्टेटस असावे कि नाही याबद्दल बरेच वाद होउ शकतात.... आणि तो आपला विषय हि नाही...
    फेबु स्टेटस उपडेत चा कहर म्हणजे खालील काही उदा .
        
             Enjoying bhel-puri with frnds..
             Enjoying amuk tamuk chi pav bhaji....
             Enjoying bhel-puri with frnds.....
 
             किंवा तमुक करत आहे, अमुक खात आहे.. बस मध्ये... ट्रेन मध्ये...वगेरे  वगेरे....
किंवा त्यापुढे जाऊन,
   :), :(, त्याच्याही पुढे जाऊन :'( रडणे , किंव ;) डोळा मारणे , :P  तोंड वाकडे दाखवणे  आणि :D  जोर-जोरात हसणे... यापैकी एक असतो, आता यातून काय कळणार... बर ते जेव्हा लिहिले तेव्हा ची परिस्थिती आणि ते जेव्हा वाचले मित्रांनी तेव्हाची परीस्थिती वेगळी असल्याने नक्कीच त्यावर काही विधान करावे किंवा like करावे हा एक प्रश्नच आहे...
      यातूनच एक नवीन भाषा उडायला आली आहे.... ते जर तुट नसेल तर तुम्ही मागास... जसे lol, asl plz, ttyl, yup, k, वगेरे वगेरे अनेक नवीन शब्द भाषेला बहाल झालेले आहेत आणि मझ्या माहिती नुसार काही शब्दांना तर Oxford शब्दकोशात हि मान्यता मिळाली आहे..तर असे म्हणणे कि भाषा दिवसेंदिवस गरीब होत आहेत हे मला जर चुकीचे वाटते जसे जुने शब्द आणि जुने वाक्यप्रयोग कालावश होतात त्याप्रमणे काही नवीनही येतात आणि जुने शब्द पूर्ण भाषेतून जात नाहीत परंतु active मधून passive होतात....
         त्यातून माझ्या काही अजून  स्टेटस नजरेत आले आहेत   खाली आहेत...
         Says "When life gives YOU lemons you can make lemonade all you want, but when life gives ME lemons Im going to make grape juice and you'll wonder how i did it!"
         u r reading my status!
         ...wonders if woodpeckers get headaches?.
         I'm not weird...
      काय म्हणावे हे मात्र काळत नाही, सुतार-पक्षाचे डोके दुखत असेल कि नसेल याची  इथे गरज काय? किंवा वाचण्या साठी लिहिलेल्या गोष्टित लिहिले असेल कि u r reading my status... तर लिहिण्याचे कष्ट कश्यासाठी?

    पूर्वी फोन असणे हे एक प्रतिष्ठेचे  लक्षण मानले जाई आज तीच गोष्ट फारच सधारण झाली आहे, यासाठी ६० च्या दशकतील गाणे "मेरे पिया गये रंगून किया है वाहसे टेलिफोन...पिया कि याद सताती है...." ते शेवटचे म्हणजे ९० चे दशक यावे लागले.... परंतु फेबु मात्र १-२ वर्षातच खूप प्रसिद्ध झाले...बर आजकाल फोन वरील संभाषणे म्हणजे निव्वळ वाद आणि फेबु स्टेटस म्हणजे त्यातुन आलेली निराशा जगा समोर ठेवण्यची जागा झालेली आहे,
    "I am very Sad....", "Feeling lonely...", "lost....", "had very long day...", "true frnds are hard to find...", "no one understands me...." या भावना पूर्वी नव्हत्या काय? मग त्यावेळी त्या मोठ्या फलकांवर रस्त्या-रस्त्यात आणि चौका-चौकात लावायला पाहिजे होत्या... वर छायाचित्र आणि खाली त्यांच्या भावना... प्रत्येक दिवशी फोटो खाली नवीन भावना, बर त्यावेळी like कदाचित घराची बेल वाजवुन  आणि commet.... घरी पत्र पाठवून केले असते...कदाचित जर पूर्वी फेबु असते तर असेच काहिसे असायला पाहिजे.... आजकाल फेबु मुले internet providers  ची चलती आहे त्यावेळी पोस्टाचा फायदा झाला असता... कदाचित तत्काली लोकांची विचार क्षमता तितकी विकसित नसावी...किंवा त्यावेळी या अश्या कृत्रिम गोष्टींची गरज कमी असावी, आणि माणसांची जास्त ओढ असावी. कारण आज तसे पहिले तर खरे मित्र या फेबु वरील मित्रांन पेक्षा कमीच असतात आणि जर अंतर ठेवूनच असतात...  

6 comments: