Friday, December 16, 2011
Tuesday, December 13, 2011
आणि अचानक स्टेशन आले...
हा खूपच मजेदार प्रसंग आहे, हा प्रसंग आम्ही अमृतसर वरून दिल्ली ला येताना चा आहे, माझे मित्र म्हणजे चांग, पवन, युवराज आणि सुनील, सुभाष सर्व जण अमृतसर वरून दिल्लीला येत होते, आणि त्यांना चंडीगड फिरायचे होते म्हणून त्यांनी अंबाला केंट पर्यंतचे तिकीट घेतले होते आणि ते अंबालाला उतरणार होते पण त्यांना गाडी अंबालाला कधी पोहोचते ती वेळ नक्की माहित नव्हती आणि त्यांच्या मते अंबाला सकाळी पाहते ५.०० वाजता येणार आहे. त्यांनी हरीकुंद एक्स्प्रेस चे तिकीट घेतले होते जी अमृतसर वरून रात्री ११.४५ ला सुटते, आणि दिवसभर अमृतसर मध्ये फिरल्यामुळे सर्वजण थकलेले होते, त्यात हि रात्रीची ट्रेन, त्यांचा एकाच बेत ठरला होतो कि ट्रेन मध्ये जाऊन निवांत झोपायचे आणि सकाळी ५.०० वाजता उठायचे. ट्रेन मध्ये बसल्या नंतर सर्व तिकीट चेकिंग वगेरे सोपस्कार पार पडल्या नंतर सर्वांनी आपापले पाथरे मांडायला सुरवात केली, त्यात सर्वात आघाडीवर सुभाष होता, त्याच्या मागोमाग चांग, पवन मात्र सुनील आणि युवराज मध्ये अजून गप्पा मारण्याची ताकद होती. ते आपले सर्व दिवसा घडलेल्या घडामोडींची चर्चा करत होते, कि चांगच्या ओळखीच्या घरी कसे पराठे छान मिळाले, त्यांच्या आदरआथीत्याचे गोडवे गाणे चालू होते आणि मधीच सकाळ पासून काढलेले फोटो हि पाहणे चालू होते,
"अरे लाईट बंद करा आणि झोप आता मला झोप आली आहे, " आणि कॅमेऱ्यातील सेल डाऊन होतील,"
असे सुभाषचे शब्द कानावर पडले, त्यांनी त्याकडे जास्त लक्ष न देता
"तू झोप रे, आम्ही झोपतो"
असे तुटक उत्तर देत आपले बोलणे चालू ठेवले, इकडे चांग चे घोरासुराचे आख्यान चालू झाले होते, आणि पवन मधून मधून या दोघांना साथदेत होता,
बर सुभाषला झोपे बद्दल विशेष तयारी करावी लागते हे सांगायचे राहूनच गेले, आता IIT होस्टेल मध्ये राहण्या ची सवय त्यात एकट्याची रूम मग काय कसे हि झोप कोण येत आहे बघायला, आता तुम्ही समजून गेलाच असाल कि त्याला जास्त कपडे न घालता झोपायची सवय आणि त्यात ट्रेन मधील सर्व कॉम्परटमेंट यांच्या कडे त्यामुळे तसे विरोध करणारे कोणी हि नाही, आणि विरोध केला जरी तरी जास्त ऐकून घेण्याची सवय आम्हला नाही,
" अरे सकळी किती वाजता गाडी पोहचते रे ते पहिला आहे का ?"
सुभाष वरून, सुनील तू झोप रे ५.०० वाजता पोहचते उठवीन तुला, "रात्रीचा एक वाजला आहे झोपरे आता आणि मला झोपुद्यात" सुभाष "सुनील बर बर झोपतो बाबा, आणि ते दोघे हि झोपले,
सुनीलला तशी लवकर उठण्याची सवय असल्याने त्याच्यावर सर्वाना उठवायची जवाबदारी होती, सुनीलला सकाळी ४.०० वाजता जाग आली तसे ट्रेन थांबल्यामुळे त्याला जंग आली होती म्हणून त्याने उठून जरा स्टेशन वर बाहेर पडला, स्टेशन वर डोळे चोळत चोळत चहा पिला आणि पाहतो तर काय अंबाला स्टेशन, आणि लगेच पळत जाऊन त्याने श्रावण उठवले अरे उठा उठा अंबाला आले आहे पटकन उठा, आणि ते सर्वजण हातात मिळेल ते घेऊन पळत स्टेशन वर आले,
" अरे माझे शूज घेतलेस का ?? " पवन. यावर सुनील चे उत्तर आले "अरे एक माझ्याकडे आणि एक युवाराज कडे आहे बघ"
" अरे माझी शाल आताच राहिली वाटते," सुभाष यावर पवन म्हणाला "अरे हि काय आहे माझ्या हातात आहे" आणि यासर्व गोष्टींची शहा-निशा चालू होती...
" आणि यातच कोणाचे तरी सुभाष कडे लक्ष गेले आणि पहिले तर सुभाष गडबडीत कपडे घालायचा विसरला होता आणि फक्त चड्डी आणि बनियन वर अम्बला स्टेशन वर उतरला होता आणि सर्वजण बराच वेळ हस्त राहिले...
मीही हा ब्लॉग सकाळी ३.०० वाजता चेन्नई ऐर-पोर्ट वर कम्प्लीट केला आहे, चान टाइम पास झाला बोर्डिंग होस तो पर्यंत .... :)
वी सु. : यातील सर्व वर्णन आणि स्वभाव तंतो - तंत नाही तरी वाचणार्यांच्या मनोरंजन सठी बनवलेले आहे परंतु प्रसंग मात्र खरा आहे....

Subscribe to:
Posts (Atom)